स्पेक्ट्रमच्या जाळ्यात संसद

November 19, 2010 2:35 PM0 commentsViews: 1

19 नोव्हेंबर

स्पेक्ट्रम घोटाळ्याबद्दल गुरुवारी आयबीएन नेटवर्कवर दाखवलेल्या बातमीचे आज संसदेत पडसाद उमटले. द्रमुकच्या नेत्यांनी पंतप्रधांनावर दबाव आणून भ्रष्टाचाराचा मार्ग मोकळा करून घेतल्याची बातमी आपण काल दाखवली होती. त्यावरून विरोधकांनी आज संसदेच्या दोन्ही सभागृहांत गदारोळ घातला. आणि टेलेकॉम घोटाळ्याची चौकशी संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी पुन्हा लावून धरली. त्यामुळे सलग दहाव्या दिवशी टेलेकॉम घोटाळ्यामुळे संसद ठप्प झाली. तत्कालीन टेलेकॉम मंत्री दयानिधी मारन आणि पंतप्रधान यांच्यातला स्फोटक पत्रव्यवहार काल आयबीएन नेटवर्कवर दाखवण्यात आला होता. त्यामुळे विरोधकांनी आग्रह धरला. की या मुद्द्यावर खुद्द पंतप्रधानांनी स्पष्टीकरण द्यावं. पण तसं न झाल्याने त्यांनी संसदेचं कामकाज चालू दिलं नाही.

close