मालेगाव स्फोटाप्रकरणी लष्करी अधिकारी संशयाच्या भोवर्‍यात

October 30, 2008 1:13 PM0 commentsViews: 5

30 ऑक्टोबर, नाशिकमालेगाव बॉम्बस्फोटाप्रकरणी एटीएसनं जबलपूरमध्ये छापा टाकला आहे. अभिनव भारत संघटनेचा उपाध्यक्ष असलेल्या मायाराम जसवानी याच्या घरावर एटीएसनं ही कारवाई केली. मायाराम मात्र फरार आहे. याप्रकरणी यापूर्वीचं 'अभिनव भारत ' च्या समीर कुलकर्णीला एटीएसनं अटक केली आहे. समीरला नाशिक कोर्टानं 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, या प्रकरणात लष्कराचे अधिकारी कर्नल प्रसाद पुरोहित यांचाही सहभाग असल्याच्या एटीएसला संशय आहे. त्यांच्या चौकशीसाठी एटीएसनं संरक्षण मंत्रालयाकडं परवानगी मागितली आहे. प्रसाद हे यापू्र्‌वीच अटक करण्यात आलेले रिटायर्ड मेजर रमेश उपाध्याय यांच्या सतत संपर्कात असल्याची माहिती मिळाली आहे. सीएनएन-आयबीएनला सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी अटकेत असलेल्या उपाध्याय यांच्याशी पुरोहित सतत संपर्कात होते,असा पुरावा एटीएसकडे आहे.

close