येडियुरप्पा यांचा पायउतार होण्याची शक्यता

November 19, 2010 5:37 PM0 commentsViews: 4

19 नोव्हेंबर

महाराष्ट्रापाठोपाठ आता शेजारच्या कर्नाटकातलं सरकारही भूखंड घोटाळ्याच्या मुद्द्यावरून कोसळण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री येडियुरप्पा सोमवारपर्यंत राजीनामा देण्याची शक्यता आहे. आयबीएन नेटवर्कने 500 कोटींचा जमीन घोटाळा बाहेर काढल्यानंतर अखेर येडियुरप्पांच्या पुत्रांना सरकारी भूखंड परत करावा लागला.

यामध्ये बंगळुरुमध्ये असलेले 4 फ्लॅट्स आणि शहराबाहेरील 2 औद्योगिक प्लॉटचा समावेश आहे. जिगानी औद्योगिक वसाहतीत मिळालेला प्लॉट येडियुरप्पा यांचा मुलगा राघवेंद्र यानं तो प्लॉट सरकारला परत केला. त्याचबरोबर येडियुरप्पा यांची मुलगी उमादेवीनंही तिला देण्यात आलेली जमीन आज सरकारकडे परत केली. याशिवाय येडियुरप्पा यांची बहीण, जावई, मुलीची सासू आणि इतर पाहुण्यांनी बळकावलेले सरकारी भूखंड आज सरकारडे परत केले. दरम्यान, पक्षाध्यक्ष नितीन गडकरींना भेटायला. मुख्यमंत्री येडियुरप्पा दिल्लीत दाखल झालेत. इथेच पक्षाचे प्रमुख नेते त्यांना राजीनामा द्यायला सांगतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

close