ए.राजा यांचे खासगी सचिव आर.के.चंडोलिया यांची हकालपट्टी

November 20, 2010 8:38 AM0 commentsViews:

20 नोव्हेंबर

ए.राजा यांच्या राजीनाम्यानंतर दूरसंचार मंत्रालयाच्या साफसफाईची मोहीम सरकारनं सुरु केली. ए. राजा यांचे खासगी सचिव आर. के.चंडोलिया यांची दूरसंचार मंत्रालयातून उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांना दूरसंचार मंत्रालयातून मूळ कॅडरमध्ये परत पाठवण्यात आलं आहे. राजा यांनीच चंडोलियांना दूरसंचार मंत्रालयात आणले होते. चंडोलिया हे राजा यांचे निकटवर्तीय समजले जातात.

कोण आहे चंडोलिया ?

चंडोलिया हे माजी दूरसंचार मंत्री ए.राजा यांचे खाजगी सचिव होते चंडोलिया सध्या दूरसंचार विभागाचे अर्थविषयक सल्लागार इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिसेसचे 1984 च्या बॅचचे अधिकारी आहेत संचार भवनमधील चंडोलिया यांचं कार्यालय 2G स्पेक्ट्रमचा लिलावाच्या वेळी सगळ्यात महत्त्वाचं कार्यालय ठरलं होतं. चंडोलिया हे ए.राजा यांचे विश्वासू समजले जातात.

close