भारताचा पाकवर दणदणीत विजय

November 20, 2010 9:02 AM0 commentsViews: 5

20 नोव्हेंबर

चीन येथे सुरु असलेल्या एशियन गेम्समध्ये आज सगळ्यांचं लक्ष होतं भारत आणि पाकिस्तान दरम्यानच्या हॉकी मॅचवर आणि पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमधल्या या मॅचमध्ये भारतीय टीमने 3-2 ने बाजी मारली. त्याचबरोबर भारताने सेमी फायनलही गाठली. पण ही मॅच शेवटपर्यंत रंगली. मॅचमध्ये शेवटपर्यंत उतार चढाव बघायला मिळाले. भारतासाठी विजयात मोलाची भूमिका संदीप सिंगने बजावली.

तिसर्‍याच मिनिटाला गोल करुन त्याने भारताला आघाडी मिळवून दिली. आणि 2-2 च्या बरोबरीच कोंडीही त्यानेच फोडली. धर्मवीर सिंगने दुसरा गोल केला. तर पाकिस्तान तर्फे रेहान बट्ट आणि शकील अब्बासीने एक एक गोल केला.

close