हिवाळी अधिवेशन 1 डिसेंबरला

November 20, 2010 9:33 AM0 commentsViews:

20 नोव्हेंबर

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नव्या मंत्रिमंडळाची आज पहिली बैठक पार पडली. ही मंत्रिमंडळाची पहिली बैठक खर्‍या अर्थाने मंत्री परिषद होती. या बैठकीला सर्व कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्री हजर होते. या बैठकीत अवकाळी पावसामुळे उदभलेल्या दुष्काळसदृश्य परिस्थितीवर चर्चा करण्यात आली.

तसेच या बैठकीत विदर्भाच्या विकासाला प्राधान्य देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार गेल्या वर्षी जाहीर केलेल्या 10 हजार कोटी रुपयांच्या विदर्भ पॅकेजच्या अंमलबजावणीचा आढावा दर महिन्याला घेण्याचे ठरवण्यात आले आहे. या खेरीज ठरल्यानुसार येत्या 1 डिसेंबरपासून नागपूरमधील हिवाळी अधिवेशन होईल, असंही सरकारने स्पष्ट केले.

close