वन खाते मिळाल्यामुळे नाराज नाही – पतंगराव कदम

November 20, 2010 9:56 AM0 commentsViews: 51

20 नोव्हेंबर

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला काही खात्यात बद्दल करण्यात आला तर काही नवीन चेहर्‍यांना समावेश मंत्रिमंडळात करण्यात आला. तर दुसरीकडे वन खातं मिळाल्यामुळं नाराज नसल्याचं काँग्रेस नेते पतंगराव कदम यांनी स्पष्ट केलं आहे. आपण आता नाराज होण्याच्या पुढं गेलो आहोत असंही ते म्हणाले. आधीचंच वन खाते मिळाल्याने पतंगराव नाराज असल्याचे बोलले जात होते. पण त्याला आता पतंगरावांनीच पूर्णविराम लावला आहे. मंत्र्यांवर होणार्‍या भ्रष्टाचारांच्या आरोपांची मुख्यमंत्र्यांनी सखोल चौकशी करावी अशी मागणी पतंगराव कदम यांनी यावेळी केली. आम्ही त्यांना सहकार्य करु असही पतंगराव म्हणाले आहेत.

close