आयफाच्या धर्तीवर मिफ्ता अवॉर्ड सोहळा

November 20, 2010 10:31 AM0 commentsViews: 3

20 नोव्हेंबर

आता आयफाच्या धर्तीवर मराठी चित्रपट आणि रंगभुमीच्या कलाकृतीचा सन्मान करणारा मिफ्ता अवॉर्ड सोहळा सुरू होणार आहे. हा पहिलाच अवॉर्ड सोहळा दुबईत रंगणार आहे. ज्याची घोषणा नुकतीच निर्माता,दिग्दर्शक महेश मांजरेकरांनी केली. अश्वमी फिल्मस् आणि राजा राणी ट्रॅव्हल्स यांनी संयुक्तपणे हे मिफ्ता अवॉर्डस आयोजित केला आहे. सचिन पिळगावकरांच्या हस्ते या मिफ्ता अवॉर्डच्या लोगोचं नुकतंच उद्घाटन करण्यात आलं. येत्या 16 ते 18 डिसेंबरदरम्यान हा पहिला वहीला अवॉर्ड सोहळा दुबईत रंगेल. आयफाच्या धर्तीवर मिफ्ता अवॉर्ड सोहळा

close