धर्मदेवची हत्या जागेच्या वादातून – राज्य सरकार

October 30, 2008 1:20 PM0 commentsViews: 3

30 ऑक्टोबर, मुंबईखोपोली लोकलमध्ये प्रवाशांच्या मारहाणीत उत्तर भारतीय तरुणाच्या मृत्यूप्रकरणी राज्य सरकारला केंद्र सरकारनं अहवाल सादर करण्यास सांगितलं होतं. त्यानुसार राज्य सरकारनं अहवाल सादर केला आहे. ही हत्या भाषिक वादातून नव्हे, तर जागेच्या वादातून झाल्याचं सरकारनं म्हटलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी 5 जणांना अटक केली आहे. दरम्यान, धर्मदेवच्या परिवाराला महाराष्ट्र सरकारनं दिलेली 2 लाख रुपयांची मदत त्याच्या कुटुंबियांनी नाकारली आहे तर धर्मदेवच्या पत्नीला रेल्वेत नौकरी देणार असल्याचं रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांनी म्हटलंय.

close