पुण्यात इंजिनीयरींग एक्स्पो मेळाव्याला सुरुवात

November 20, 2010 12:02 PM0 commentsViews: 1

20 नोव्हेंबर

पुण्यात पिंपरी-चिंचवड येथे नव्या उद्योजकांसाठी हक्काचं व्यासपीठ ठरलेल्या ''इंजिनीयरींग एक्स्पो''मेळाव्याला सुरुवात झाली आहे. इन्फोमिडिया 18 आणि नेटवर्क 18 यांनी हा मेळावा आयोजित केला. आधुनिक मशीन्स, टुल्स,अक्सेसिरीज, लॉजिस्टीक, मटेरिअल, हॅडलींग,पॉवर सप्लाय प्रॅाडक्ट अशा वेगवेगळ्या कंपन्या यात सहभागी झाल्या. प्रदर्शनाला प्रतिसादही चांगला मिळतो. हा मेळावा 23 नोव्हेंबरपर्यंत सुरु राहणार आहे.

यंदाचा हा पाचवा एक्स्पो आहे, या वर्षी या एक्स्पोमध्ये तब्बल दोनशे कंपन्यानी सहभाग नोंदविला आहेत. गेल्यावर्षीच्या एक्स्पोमध्ये सहभागी झालेल्या उद्योजकांनी 65 कोटीरुपयांचा व्यवसाय केला होता, त्यामुले हा एक्स्पो त्यांच्यासाठी वरदान ठरत आहे. पिंपरी-चिचंवड इथल्या ऍटोक्लस्टरमध्ये सुरु असलेल हे प्रदर्शन 23 नोव्हेंबर पर्यंत खुल असणार आहे.

close