बाथरुम सिंगर्सचा अनोखा क्लब

November 20, 2010 7:49 AM0 commentsViews: 1

प्रियांका देसाई, मुंबई

20 नोव्हेंबर

बाथरुम सिंगर्स म्हणजे असे हौशी गायक ज्यांना इतरांसमोर आपले सुर, छेडायला एकतर आवडत नाही, किंवा संकोच वाटतो. पण अशाच लोकांनी एकत्र येऊन इंडियन कराओके क्लब सुरु केला आहे. आपली गायनाची हौस तर ते पूर्ण करतच आहेत, आणि त्याच बरोबर आपल्या गायनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करुन सामाजिक कार्यही करीत आहेत.

या क्लबच वैशिष्ट्य आहे की इथे कशाच बंधन नाही, वयाच नाही,कुठल्या संगीत शिक्षणाची गरज नाही. दर रविवारी जमणा-या या ग्रुप मध्ये कोणी मोटर मन, कोणी लायब्ररी मालक, कोणी फॅशन डिझायनर तर कोणी गृहिणी किंवा निवृर्तीधारक पण आहे. इथं आल्यापासून सगळेच गायक झाले आहे. हा क्लब फॅशन इंस्टिट्यूटचे डिरेक्टर नितीन मगर यांनी सुरु केला.

close