राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा – उध्दव ठाकरे

November 20, 2010 1:13 PM0 commentsViews: 3

20 नोव्हेंबर

गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. आज उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन ही मागणी केली. त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे आणि शिवसेनेचे इतर नेतही उपस्थित होते. शेतक-यांना प्रतिएकर 10 हजार तातडीची नुकसान भरपाई द्यावी. गरजू शेतक-याला धान्यपुरवठा बीपीएल प्रमाणे करावा. राज्यभर रोहयोची कामं तातडीने सुरू करावी. रब्बी पिकासाठी बी बियाणे आणि खतांचा पुरवठा मागणीप्रमाणे त्वरित करावा. अशा मागण्याही उद्धव ठाकरेंनी यावेळी केल्या.

close