महाराष्ट्रातलं सरकार बरखास्त करा – मायावती

October 30, 2008 2:59 PM0 commentsViews: 6

30 ऑक्टोबर, लखनौमहाराष्ट्रात होत असलेल्या उत्तर भारतीयांवरील हल्ले लक्षात घेता केंद्रानं विलासरावाचं सरकार बरखास्त करावं, अशी मागणी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांनी केली आहे. महाराष्ट्रात होणार्‍या घटनांना केंद्र सरकार आणि भाजपही तितकाच जबाबदार असल्याचं यावेळी मायावतींनी सांगितलं.खोपोली लोकलमध्ये झालेल्या मारहाणीत एका उत्तर भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला. त्यानंतर उत्तर भारतीय नेत्यांनी त्याच्यावरही राजकारण सुरू केलंय. ' उत्तर भारतीयांवर वारंवार होणारे हल्ले पाहता तिथली कायदा सुव्यवस्था बिघडली आहे. त्यामुळं तिथलं सरकार बरखास्त करावं ', असं मायावती पत्रकार परिषदेत म्हणाल्या. दरम्यान, राहुल राज प्रकरणावरून बिहारी नेते केवळ राजकारण करत असून लालू, पासवान हे बिहारी लोकांची दिशाभूल करत आहेत, असा आरोप मायावतींनी यावेळी केला.

close