दहावी – बारावी परिक्षेच्या तारखा जाहीर

November 20, 2010 4:39 PM0 commentsViews: 5

20 नोव्हेंबर

यंदाच्या दहावी – बारावी परिक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. बारावीची परीक्षा 22 फेब्रुवारी ते 29 मार्च यादरम्यान होणार आहे तर दहावीची परिक्षा 1 मार्च ते 25 मार्च या दरम्यान होणार आहे. विद्यार्थ्यांवरचा ताण कमी करण्याच्या दृष्टीने लेखी परीक्षेदरम्यान खंड ठेवण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची परिपत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली.

close