बिहारमध्ये पुन्हा नितीशकुमार !

November 20, 2010 5:08 PM0 commentsViews: 2

20 नोव्हेंबर

बिहारमधल्या निवडणुकांचे पाचही टप्प्यांचे मतदान पूर्ण झाले आहे. आज शेवटच्या टप्प्यात 26 मतदारसंघात 51 टक्के मतदान झाले. मतदानानंतरच्या चाचणीचे निष्कर्ष समोर आले आहे. आयबीएन लोकमत, द वीक आणि सीएसडीएस सर्व्हेनुसार एनडीए सरकार आघाडीवर आहे. एकूण 243 जागांसाठी ही लढत होती. 24 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. माओवाद्यांनी बक्सर, कैमुर, रोहतास, औरंगाबाद, गया या भागात मतदानावर बहिष्कार टाकला होता.

एकूण जागा – 243

संभाव्य जागा

जेडीयू+भाजप – 187 – 203

राजद + लोजपा – 19 – 29

काँग्रेस – 6 – 12

इतर – 10 – 20

close