बिहारमध्ये बॉम्बस्फोट 7 मुल ठार

November 21, 2010 9:48 AM0 commentsViews: 7

21 नोव्हेंबर

बिहारमध्ये औरंगाबाद जिल्हात झालेल्या सिलेंडर बॉम्ब स्फोटात 7 शाळकरी मुल ठार झालेत तर 4 मुलं जखमी झाले आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. काल अंतिम फेरीच मतदान संपल्यानंतर पोलिसांना हा बॉम्ब सापडला होता. मात्र बॉम्ब निकामी करण्यासाठी पोलिस बॉम्ब डिस्पोजल स्कॉडची वाट पाहत बसले.आज सकाळी हे पथक पोहोचणार होत. मात्र या दरम्यान शाळकरी मुलांनी या बॉम्बला हात लावला आणि खेळण्याचा प्रयत्न केला. हे सर्व मुल शिकवणी वर्गाला जात होते. त्यातच या बॉम्बचा स्फोट झाला आणि 7 लहानग्यांना जणांना आपला प्राण गमावावा लागला.

close