रेल्वे प्रशासनाच्या आश्वसनानंतर आंदोलन मागे

November 21, 2010 10:19 AM0 commentsViews: 1

21 नोव्हेंबर

मुंबईत विक्रोळी-घाटकोपर दरम्यान मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती.विक्रोळी स्टेशनवर दोन महिलांना लोकलची धडक लागल्यामुळे या दोन्ही महिलांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त प्रवाशांनी रेल रोको आंदोलन केलं. या आंदोलनात मनसेचे आमदार राम कदम सहभागी झाले होते. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. गेल्या 22 दिवसात विक्रोळी स्टेशनजवळ 5 जणांनी जीव गमावला. या आंदोलनामुळे विक्रोळी ते घाटकोपर मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान, प्रवाशांनी आंदोलन मागे घेतलं आहे. रेल्वे वाहतूक पूर्वपदावर आली आहे.

close