भारतीय शुटर्सची गोल्डन कामगिरी

November 21, 2010 11:29 AM0 commentsViews:

21 नोव्हेंबर

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतानं आज तिसर्‍या गोल्ड मेडलची कमाई केली आहे. शूटींगमध्ये भारताच्या रंजन सिंग सोधीने गोल्ड पटकावल आहे. मेन्स डबल ट्रॅपमध्ये त्याने हे गोल्ड मेडल पटकावल आहे. रंजन सोधीने एकुण 186 पॉईंटसची कमाई केली. एशियन गेम्समध्ये शुटींगमध्ये भारताचे हे पहिले गोल्ड मेडल ठरले आहे. याअगोदर भारताच्या पंकज अडवाणीने स्नुकरमध्ये तर बजरंगलाल ठक्करने रोईंगमध्ये भारताला गोल्ड मिळवुन दिले होते. भारताच्या नावावर आता एकुण 26 मेडल्स जमा झाली.

close