आंध्रात जगनमोहन रेड्डींचे काँग्रेसविरुद्ध बंड

November 21, 2010 12:20 PM0 commentsViews: 4

21 नोव्हेंबर

खासदार जगनमोहन रेड्डी यांनी काँग्रेस हायकमांडविरुध्द उघडपणे बंड पुकारलं आहे .आंध्र प्रदेशचे दिवंगत मुख्यमंत्री राजशेखर रेड्डी यांचे जगनमोहन सुपुत्र आहेत. जगमोहन यांची मालकी असलेल्या साक्षी न्यूज चॅनेलने एका कार्यक्रमात सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग यांना टार्गेट केले. यात सोनिया गांधी या रबर स्टॅम्प असून मनमोहन सिंग कमकुवत पंतप्रधान असल्याचे म्हंटले आहे. के. रोसय्या यांच्या जागी मुख्यमंत्रीपदावर वर्णी लागावी यासाठी जगनमोहन प्रयत्नशील आहेत.

पण हायकमांडने त्यांच्या मागणीकडे सतत दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे जगनमोहन रेड्डी नाराज आहेत. दरम्यान, जगनमोहन प्रकरणावर साक्षी टीव्हीकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. आम्ही प्रसारित केलेल्या बातमींशी जगनमोहन रेड्डी यांचा संबंध नाही. हा संपादकीय निर्णय होता असं साक्षी न्यूज चॅनेलचे सीईओ राम रेड्डी यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री के रोसैय्या यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. जगमोहन रेड्डी यांनी ज्या पद्धतीने हे वृत्त प्रसारित केले ते आक्षेपार्ह असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

close