जमिनीच्या योग्य मोबदल्यासाठी गोसेखुर्द धरणग्रस्त उतरले रस्त्यावर

November 21, 2010 12:51 PM0 commentsViews: 25

प्रशांत कोरटकर, नागपूर

21 नोव्हेंबर

भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणाच पाणी सोडल्यामुळे रस्त्यावर उतरले आहे. याभागातील धान आणि मिर्चीच्या पिकावर पाणी फिरले आहे. आसपासच्या अनेक गावामध्ये पाणी शिरल्यानं रस्त्यावर तर पाणी आहेच पण घरांमध्ये ही पाणी शिरलं आहे अस असून ही इथले शेतकरी घर सोडून जायला तयार नाहीत.

भंडारा जिल्ह्यातील जीवनापूर आणि गोसेखुर्द येथे धरणासाठी ज्या शेतक-यांची जमीन सरकारनं घेतली त्या शेतकर्‍यांचा योग्य मोबदल्यासाठी संघर्ष सुरू आहे. सुधारीत मोबदला मिळत नाही तोपर्यंत गाव सोडणार नाही असा निर्धार या शेतकर्‍यांनी केला.

भंडारा जिल्ह्यातील अनेक भागात गोसेखुर्द धरणाचं पाणी सिंचनासाठी वापरलं जाणार आहे. यासाठी केंद्रसरकारने या प्रकल्पाला राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा दिला. पण राज्य सरकारनं पाणी अडवलं तरच पुढचा निधी दिला जाईल असं केंद्राने बजावलं होते. त्यामुळे राज्य सरकारनं पाणी अडवलं. त्यामुळे या गावांमध्ये पाणी शिरलं आहे.

30 वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या प्रकल्पाचं काम अजुनही सुरूच आहे. एकीकडे गावकर्‍यांना सुधारीत मोबदला हवा आहे, तर दुसरीकडे सिंचन सुरू झाल्याशिवाय केंद्राचा निधी मिळणार नाही. त्यामुळे हा प्रकल्प आणखी किती काळ रखडणार हा खरा प्रश्न आहे.

close