राहुल राज प्रकरणाची सीबीआय चौकशीची खासदारांकडून मागणी

October 30, 2008 3:04 PM0 commentsViews: 1

30 ऑक्टोबर, बिहारबेस्ट बसमध्ये अंदाधुद गोळीबार करणार्‍या राहुल राज या बिहारी तरुणाचं एन्काऊंटर झालं. या एन्काऊंटर प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी राष्ट्रीय जनता दलाच्या 6 खासदारांनी केली आहे. 6 नोव्हेंबरपर्यंत सरकारनं यावर निर्णय घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. सरकारनं यावर निर्णय घेतला नाही तर राजीनामा देण्याची धमकी या खासदारांनी दिली आहे.

close