गोव्यात सोमवापासून 41 व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल

November 21, 2010 1:04 PM0 commentsViews: 8

21 नोव्हेंबर

सध्या गोव्यामध्ये 41 व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलचे वारे वाहायला लागले आहे. पणजीच्या आयनॉक्स थिएटरमध्ये त्याचं सध्या जोरात काम सुरू आहे. सोमवारपासून सुरू होणारा हा फेस्टिवल 2 डिसेंबरपर्यंत सुरू असणार आहे. अनेक बॉलिवूड हस्ती इथे येणार आहेत. वेगवेगळे इव्हेंट्स इथे होतील. देश-विदेशातल्या सिनेरसिकांची गर्दीसुद्धा इथे होणार आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागात पीपली लाईव्ह, उमेश कुलकर्णी दिग्दर्शित 'विहीर', आणि गौतम घोष यांच्या 'मोनेर मानुष' असे तीन भारतीय सिनेमे आहेत. या फिल्म फेस्टिव्हलचे उद्घाटन उद्या यश चोप्रा यांच्या हस्ते होणार आहे.

close