अवकाळी पावसाचा धुमाकूळ सुरुच

November 21, 2010 2:23 PM0 commentsViews: 5

21 नोव्हेंबर

राज्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसाचा शेतकर्‍यांना जोरदार फटका बसला आहे. विदर्भात कापूस आणि ज्वारीला पावसाचा फटका बसला. कापूस सध्या वेचणीला आलाय, पावसानं तो ओला झाल्यामुळं त्याचा भाव घसरतो, तर ज्वारी काळी पडल्यानं शेतकर्‍यांना कमडीमोल भावानं ती विकावी लागणार आहे. कांदा, सोयाबीन आणि धान या पिकांनाचंही पावसामुळं प्रचंड नुकसानं झाल आहे.

अवकाळी पावसामुळं बीड जिल्ह्यात 56 हजार हेक्टर शेतीचं नुकसान झालं आहे. हे नुकसान जवळ जवळ 38 कोटींचं आहे. यात तूर आणि कापसाचं पिक मोठ्या प्रमाणावर वाहून गेलं आहे. ऐन हंगामात पिकाचं नुकसान झाल्याने शेतकर्‍यांच्या नशिबी मात्र पुन्हा कर्जबाजारीपणा आला आहे. नुकसान भरपाईसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवल्याचं जिल्हाधिकारी सांगत असले तरी प्रत्यक्षात मात्र शेतकर्‍यांच्या हातात काहीच पडलेलं नाही.

शेतकर्‍यांच्या नुकसानाचा मुद्दा कॅबिनेटमध्ये उपस्थित करणार – थोरात

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीपोटी मदत म्हणून सरकार शेतकर्‍यांना दर हेक्टरी 10 हजार रुपये मदत देतं. पण, ही मदत फार अपूरी आहे त्यामुळे जास्तीच्या मदतीसाठी कॅबीनेटमध्ये हा मुद्दा उपस्थित करणार असल्याचं महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केलं.

close