ब्रिटीश नागरिक दांडी यात्रेवर

November 21, 2010 11:54 AM0 commentsViews: 17

21 नोव्हेंबर

12 मार्च 1930 साली महात्मा गांधी यांनी दांडी यात्रा काढून ब्रिटीश राजवटीविरुध्द रणशिंग फुकंल होते. तब्बल 80 वर्षानंतर एका ब्रिटीशानं याच मार्गावरुन दांडी यात्रेचा प्रवास सुरु केला आहे. सामाजिक कार्यासाठी निधी गोळा करण्यासोबतच गांधीजीचे विचार जिवंत ठेवण्याचा उद्देश या यात्रेमागचा आहे.

भारतातीतल ब्रिटीश उचायुक्ताच्या पत्नी जील बेकींगहम यांनी ही दांडी यात्रा सुरु केली. त्यांच्याबरोबर 20 जणांची एक टीम आहे.अहमदाबादपासून त्यांनी दांडीमार्चला सुरुवात केली. जील, गांधी विचाराच्या कट्टर अनूयायी आहेत. जीलला, सामाजिक कामसाठी 60 लाखांचा निधी उभारायचा आहे. ही टिम 4 डिसेंबरला दांडी इथ पोहोचणार आहे. केवळ निधी गोळा करणे एवढाच उद्देश या यात्रेमागचा नाही. मात्र गांधीजीचेविचार जिवंत ठेवणे हा उद्देश आहे. या यात्रेतून गोळा होणार निधी दारिद्र रेषेखालच्या लोकांसाठी काम करणार्‍या सहा सामाजिक संस्थाना दिला जाणार आहे.

close