नवी मुंबई विमानतळाला अखेर मंजुरी

November 22, 2010 9:34 AM0 commentsViews: 5

22 नोव्हेंबर

नवी मुंबई विमानतळाला आज पर्यावरण मंत्रालयाचा हिरवा सिग्नल मिळाला आहे. आज दुपारी अडीच वाजता पर्यावरण मंत्री जयराम रमेश, नागरी हवाई वाहतूक मंत्री प्रफुल्ल पटेल आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची दिल्लीत संयुक्त पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा करणार आली आहे. नवी मुंबईचं प्रस्तावित विमानतळ ज्या ठिकाणी बांधण्यात येणार आहे त्या ठिकाणी पर्यावरणाचे मोठ नुकसान होतयं असं म्हणत जयराम रमेश यांनी जोरदार आक्षेप घेतला होता. या भागातल्या खारफुटी, डोंगर, नद्यांची हानी होणार होती. पण आता या सर्व मुद्यांवर तोडगा काढण्यात आला आहे. अखेरीस आज नवी मुंबई विमानतळाला हिरवा सिग्नल मिळाला आहे.

नवी मुंबई विमानतळ हा महाराष्ट्राच्या विकासातला महत्त्वाचा टप्पा आहे असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. पर्यावरण मंत्रालयाने या विमानतळाबद्दल केलेल्या सूचनांचे पालन केले जाईल, अशी हमी प्रफुल्ल पटेल यांनी दिली. विमानतळाच्या जागेतल्या गावांमध्ये 3000 कुटुंबांचे स्थलांतरही करावे लागणार आहे. या गावकर्‍यांचे योग्य पुनर्वसन केले जाईल, असं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितल आहे.

नवी मुंबई एअरपोर्टला पर्यावरण मंत्रालयाने परवानगी दिली. पण एअरपोर्टला परवानगी देताना पर्यावरण मंत्रालयाने काही गोष्टी स्पष्ट केल्या आहे. एअरपोर्टसाठी गाढी नदीचा प्रवाह बदलणार नाही 161 हेक्टरवर मॅनग्रूव्हच्या बदल्यात 650 हेक्टरवर नवी मॅनग्रूव्हची लागवड करणार पर्यावरण मंत्रालयाने केलेल्या 32 सूचनांचे पालन करणार असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले.

close