कलमाडींना अटक होण्याची शक्यता

November 22, 2010 9:59 AM0 commentsViews: 1

22 नोव्हेंबर

कॉमनवेल्थ घोटाळ्याप्रकरणात सुरेश कलमाडी यांना अटक होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. कलमाडींच्या तीन सहकार्‍यांना यापूर्वीच अटक करण्यात आली. या तिघांनाही आज कोर्टात हजर करण्यात येईल. सीबीआयनं टी.एस दरबारी, संजय महेंद्रु आणि आयोजन समितीचे कोषाध्यक्ष जयचंद्रन यांना यापूर्वीच अटक केली आहे. सुरेश कलमाडींवरही सीबीआयची करडी नजर असल्यानं सीबीआय आता कुठलं पाऊल उचलते याकडं सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

close