खोपोली घटनेप्रकरणी 6 जण ताब्यात, पालकांचा आंदोलनाचा इशारा

October 30, 2008 5:12 PM0 commentsViews: 7

30 ऑक्टोबर, कर्जतअजित मांढरेतीन दिवसांपूर्वी खोपोलीत लोकलमध्ये 4 उत्तर भारतीयांना मारहाण करण्यात आली होती. त्यामध्ये धर्मराज या व्यक्तीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात कर्जत पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतलं होतं. आरोपींना कल्याणच्या कोर्टात गुरुवारी हजर करण्यात आलं. रेल्वे कोर्टानं त्यांना 3 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कस्टडी दिली आहे. दरम्यान, हे सर्व एकाच गावातील असून ते निर्दोष आहेत, असा दावा आरोपींच्या पालकांनी केला आहे. तीन दिवसांपूर्वी खोपोली रेल्वेत झालेल्या मारहाणप्रकरणी राज्य सरकारनं केंद्राला प्राथमिक अहवाल सादर केला. त्यात हे प्रकरण मराठी विरूद्ध अमराठी नसून विंडो सिटवरून झाल्याचं स्पष्ट झालं आहे. दरम्यान अटक करण्यात आलेले तरुण निर्दोष असल्याचा दावा पालकांनी केला आहे. ' माझा मुलगा 12 वीत असून त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतोय, असं पोलिसांनी सांगितलं. पण त्याला अटक करण्यात आली आहे ',असं दिलीप हडप सांगत होते. अटक केलेल्या मुलांना लवकरात लवकर सोडलं नाही, तर तीव्र आंदोलनाचा इशारा केलवली गावच्या सरपंचांनी दिला आहे.

close