येडियुरप्पांचा राजीनामा 3 अटींच्या मोबदल्यात

November 22, 2010 11:18 AM0 commentsViews: 3

22 नोव्हेंबर

येडियुरप्पा यांची आज उचलबांगडी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. राजीनाम्यासाठी येडियुरप्पांवर पक्षातून दबाव वाढला आहे. पक्षश्रेष्ठींनी त्यांना राजीनामा द्यायला सांगितला आहे. पण राजीनामा देण्यासाठी येदियुरप्पांनी काही अटी घातल्यात, त्या अटी मान्य केल्या तरच राजीनामा देऊ अशी अट येडियुरप्पांनी घातली आहे.

येडियुरप्पांच्या तीन अटी

1- राजीनामा दिला तरी, कर्नाटकचा पुढचा मुख्यमंत्री मीच ठरवणार, अशी अट येडियुरप्पांनी घातली2- भ्रष्टाचार प्रकरणात नाव असलेल्या रेड्डी बंधूना पुढच्या मंत्रिमंडळात स्थान नको अशी येडियुरप्पांची आग्रही मागणी आहे3- भाजपचे कर्नाटकातले ज्येष्ठ नेते अनंतकुमार यांना राज्याच्या राजकारणापासून आणि सध्याच्या घडामोडींपासून दूर ठेवण्यात यावे

close