विक्रोळीत 15 जानेवारीपासून पादचारी पुलाचं काम सुरू होणार

November 22, 2010 11:56 AM0 commentsViews: 5

22 नोव्हेंबर

मुंबईतील विक्रोळी रेल्वे स्टेशनवरील आंदोलनाची सरकार आणि रेल्वे प्रशासनाने दखल घेतली आहे. विक्रोळी रेल्वेस्थानकावर येत्या 15 जानेवारीपासून पादचारी पुलाचं काम सुरू करण्यात येईल. तसेच या स्थानकावरच्या फ्लायओव्हर ब्रीजला तातडीने एनओसी देण्याचे निर्देश मुंबई महानगरपालिकेला राज्यसरकारने दिले. तसेच रेल्वे अपघातांच्या संख्येत घट झाली नाही तर हलगर्जी करणार्‍या रेल्वे अधिकार्‍यांवर गुन्हे दाखल करण्यात येतील असा इशारा राज्य सरकारने रेल्वे प्रशासनाला दिला आहे. राज्य सरकारने रेल्वे प्रशासन आणि स्वयंसेवी संघटनानंबरोबर तसेच लोकप्रतिनिधींबरोबर बैठक घेतली. या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले.

close