नागपूर टेस्टमध्ये भारत 566 धावांवर डाव घोषित

November 22, 2010 12:39 PM0 commentsViews: 3

22 नोव्हेंबर

नागपूर टेस्टमध्ये अखेर भारताने आपली पहिली इनिंग आठ विकेटवर 566 रन्सच्या स्कोअरवर घोषित केली. भारतातर्फे सर्वाधिक ते राहुल द्रविडने केल्या मात्र त्याची डबल सेंच्युरी हुकली. विल्यमसनने त्याला 191 रनवर आऊट केलं. त्यापूर्वी महेंद्र सिंग धोणीची सेंच्युरीही अवघ्या दोन रननी हुकली. पण दोघांनी 193 रन्सची महत्त्वपूर्ण पार्टनरशिप केली.

नागपूर टेस्टवर भारतीय टीमने आता मजबूत पकड बसवली. तिसर्‍या दिवस अखेर भारतीय टीमकडे 349 रन्सची आघाडी आहे. आणि दुसर्‍या इनिंगमध्ये न्यूझीलंडची एक विकेटही गेली. भारतासाठी आजचा दिवस राहुल द्रविड आणि महेंद्र सिंग धोणीने गाजवला. द्रविड 191 आणि धोणीच्या 98 रन्समुळे भारतीय टीम 566 रन्सचा स्कोअर उभा करु शकली. आज सकाळी सचिन, लक्ष्मण आणि रैना झटपट आऊट झाले. त्यानंतर धोणी – द्रविडची जोडी जमली. आणि दोघांनी सहाव्या विकेटसाठी 193 रन्सची पार्टनरशिप केली. द्रविडने आपली 31वी टेस्ट सेंच्युरी केली. पण धोणीची सेंच्युरी दोन रन्सनी हुकली. दोघं आऊट झाल्यावर आठ विकेटवर 566 रन्सच्या स्कोअरवर भारताने आपली पहिली इनिंग घोषित केली. न्यूझीलंडतर्फे सगळ्यात यशस्वी डॅनिअल व्हिटोरी बोलर ठरला. तीन विकेट त्याने मिळवल्या त्या 178 रन्सचं मोल देत. त्यानंतर टीम मॅकेन-टॉश आणि मॅक्युलम यांनी न्यूझीलंडच्या दुसर्‍या इनिंगला सुरुवात केली. दोघं सावध बॅटिग करत होते. पण हरभजनने मॅकेनटॉशला आठ रन्सवर आऊट केले. तिसर्‍या दिवसअखेर मॅक्युलम 15 तर नाईट वॉचमन हॉप-किन्स एका रनवर खेळत आहे.

close