मधू दंडवते यांच्या मृत्यूपत्रासाठी लाच मागण्याचा प्रकार उघडकीस

November 22, 2010 7:57 AM0 commentsViews: 60

22 नोव्हेंबर

मधू दंडवतेंसारख्या साध्या आणि व्रतस्थांच्या मृत्यूपत्रासाठी देखील लाच द्यावा लागण्याचा लाजिरवाणा प्रकार घडला आहे. अखेर दिवंगत ज्येष्ठ समाजवादी नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मधू दंडवते यांच्या मृत्यूपत्र संदर्भात हाय कोर्टाने संबंधित अधिकार्‍यांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

टेस्टा-मेंटरी डिपार्टमेंटच्या म्हणजेच मृत्यूपत्र विभागाच्या अधिकार्‍यांनी दंडवते यांचं मृत्यूपत्र प्रमाणित करण्यासाठी त्यांचा मुलगा उदय यांच्याकडे लाच मागितली. असा आरोप उदय यांनी केला. लाच देण्यास नकार दिल्यामुळेच मृत्यूपत्र प्रमाणित करण्यात आले नाही असे उदय यांचे म्हणणे आहे. अखेर हाय कोर्टाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आणि मृत्यूपत्र प्रमाणित का केले नाही याच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

close