हिवाळी अधिवेशनासाठी शिवसेनेची बैठक

November 22, 2010 3:32 PM0 commentsViews: 2

22 नोव्हेंबर

येत्या हिवाळी अधिवेशनात सरकारला सळो की पळो करून सोडण्याची रणनिती शिवसेनेने आखली आहे. जोगेश्वरीच्या मातोश्री क्लबवर आज शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या आमदारांची बैठक घेतली. आदर्श घोटाळा प्रकरणी सरकार बॅकफूटवर असताना हीच संधी साधून विरोधी पक्षाचे अस्तित्व जोरकसपणे दाखवण्याचा विचार शिवसेनेच्या विधीमंडळातल्या नेत्यांनी केला. गेल्या काही अधिवेशनात चांगले मुद्दे हाताशी असतानाही विरोधी पक्षाला सरकारला कात्रीत पकडता आलं नाही अशी टीका केली जात होती. तसेच विधानसभेचे उपाध्यक्षपद ही विरोधी पक्षाला द्यावे या भाजपच्या मागणीलाही शिवसेनेने पाठिंबा दिला आहे.

close