कोट्यावधी रूपयांचा घातला गंडा

November 22, 2010 3:34 PM0 commentsViews: 5

22 नोव्हेंबर

सोलापुरात नागरिकांना फसवणा-या रविंद्र देशमुख नावाच्या व्यक्तीविरूद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.इमेज लाईफ स्टाईल प्रायव्हेट लिमिटेड आणि अंकीत आर्यारूप टुरिझम अँड क्लब रिसोर्ट चे कार्यकारी संचालक असलेल्या रविंद्रनं लवकर पैसा मिळवून द्यायचं, चंदेरी दुनियेचे आमीष दाखवून सामान्यांना कोट्यावधी रूपयांचा गंडा घातला आहे. आपली फसगत झाली हे लक्षात येताच अंबादास पुल्ला यांनी रविंद्र विरूद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी याबाबत गुन्हा नोंदवला असून ते अधिक तपास करत आहेत.

close