मुलांचं लैंगिक शोषण करणार्‍या भोंदूबाबाला अटक

November 22, 2010 10:42 AM0 commentsViews: 3

22 नोव्हेंबर

आश्रमातल्या मुलांचे लैंगिक शोषण करण्याच्या आरोपावरून पिंपरी चिंचवडमधल्या बालकाश्रमातल्या भोंदूबाबाला अटक करण्यात आली. दिपक लांबखडे असे या भोंदूबाबाचे नाव आहे. शिंदेवाडीमध्ये त्याचा आश्रम आहे. मोफत शिक्षण देतो असं सांगून त्याने सहा मुलांना दत्तक घेतले होते. गेल्या तीन ते चार महिन्यांपासून दिपक या मुलांवर अत्याचार करत होता. दिवाळीच्या सुट्टीवर ही मुलं घरी गेली असता त्यांनी पालकांकडे या भोंदूबाबाची तक्रार केली. त्यानंतर घडलेला प्रकार उघडकीला आला. याबाबत पालकांनी भोसरी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. दिपक लांबखेडे याला 23 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

close