सुमारे 25 टक्के कर्मचार्‍यांच्या नोकर्‍या धोक्यात – आसोचेमचा रिपोर्ट

October 31, 2008 5:49 AM0 commentsViews: 3

31 ऑक्टोबर, दिल्लीब्युरो रिपोर्टयेत्या काही दिवसांत काही सेक्टर्समध्ये पंचवीस टक्क्यांपेक्षा जास्त कर्मचार्‍यांची नोकरी जाण्याची शक्यता आहे, असं असोचेमच्या रिपोर्टमध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे. मात्र रिपोर्टमध्ये त्रुटी असल्याचं फिक्कीचं म्हणणं आहे. जागतिक मंदीचा फटका लहान-मोठ्या उद्योगांना बसतोय. त्यामुळे सगळीकडेच कॉस्ट-क टिंगचं सत्र सुरू आहे. त्यातंच गेल्या दोन-तीन महिन्यात आर्थिक प्रगतीचा वेगही मंदावला आहे. त्यामुळे कंपन्यांनाही स्पर्धेत टिकून राहण्यासाठी कॉस्ट कटिंगशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. गेल्या काही दिवसांपूर्वी टाटा स्टील कंपनीनं शंभर कर्मचार्‍यांना नोकरीवरून कमी केलं होतं. त्याशिवाय जेटनेही एकोणीसशे कर्मचार्‍यांना नोकरीवरून काढण्याचा प्रयत्न केला होता. त्यात आता ' असोचेम' म्हणजे ' असोसिएटेड चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅन्ड इंडस्ट्री ऑफ इंडियानं ' दहा दिवसांत काही सेक्टरमध्ये पंचवीस टक्क्यांपेक्षा जास्त कर्मचार्‍यांची नोकरी जाण्याची शक्यता असल्याचं स्पष्ट केलं आहे.असोचेमच्या रिपोर्टनुसार कॉस्ट कटींग करण्यासाठी अनेक बड्या कंपन्या कर्मचार्‍यांची कपात करणार आहेत. मुख्य म्हणजे आयटी, बँकिंग आणि बीपीओ सेक्टरमध्ये ही कपात होण्याची शक्यता असल्याचं रिपोर्टमध्ये म्हटलंय. पण दुसरीकडे या रिपोर्टमध्ये काही त्रुटी असल्याचं फिक्कीचं म्हणणं आहे.एकूणच हा रिपोर्ट वादाच्या भोवर्‍यात सापडला असला तरी , कॉस्ट कटींगचा मुद्दा सर्वसामान्य कर्मचार्‍यांच्या दृष्टीनं गंभीर आहे.

close