विद्यार्थ्यांचा म्हाडाच्या कार्यालयावर मोर्चा

November 22, 2010 4:16 PM0 commentsViews: 2

22 नोव्हेंबर

1991 पासुन सुरु असलेली उर्दु शाळा म्हाडानी पाडुन टाकल्याच्या निषेधार्थ आज शाळेतल्या विद्यार्थ्यांनी म्हाडाच्या ऑफिसवर मोर्चा काढला. येरवडा इथल्या म्हाडाच्या जमिनीवर अतिक्रमण करुन ही शाळा बांधण्यात आली होती. तसेच शाळेला वारंवार नोटिस बजावुनही त्यांनी ती शाळा हलवली नाही असं म्हाडाच्या पुणे विभागाचे अध्यक्ष अंकुश काकडेंचं म्हणणं आहे. तर आपल्याला म्हाडाची कुठलीही नोटीस मिळालीच नाही उलट वारंवार मागणी करुनही शाळेसाठी आरक्षित केलेली ही जमिन म्हाडानी दिली नाही असा आरोप शाळेच्या संचालकांनी केला आहे. 2004 मध्ये या शाळेला मान्यताही मिळाली आहे. तब्बल 19 वर्ष ही शाळा सुरु होती. पण यंदा शैक्षणिक वर्षाच्या मध्येच इमारत पाडून टाकल्यानं शाळेत शिकणार्‍या 230 विद्यार्थ्यांसाठी शाळेची इमारतच उपलब्ध नाही. विद्यार्थ्यांचं वर्ष वाया जाऊ नये, यासाठी आता तोडगा निघणार का? असाच प्रश्न आता विचारला जात आहे.

close