मिलिंद गुणाजीच पुस्तक ‘मिस्टीकल मॅजिकल महाराष्ट्र’ वादाच्या भोवर्‍यात

November 22, 2010 4:49 PM0 commentsViews: 2

22 नोव्हेंबर

प्रसिद्ध अभिनेता आणि वनविभागाचा ब्रँड ऍम्बेसिडर असलेला मिल्ंादि गुणाजी एका वादात सापडला आहे. मिलिंदने आपल्या ब्रॅड ऍम्बेसिडर पदाचा गैरवापर केल्याचा आरोप घाटघरच्या ग्रामस्थांनी केला. मिलिंदनं 'मिस्टीकल, मॅजिकल महाराष्ट्र' या आपल्या इंग्रजी पुस्तकात जुन्नर तालुक्यातील सह्याद्रीच्या रांगांमधील नाणेघाटातील 'चित्तर कड्या' चे नावं 'गुणाजी कडा' असं ठेवल आहे. मिलिंद गुणाजीवर कारवाई करावी आणि त्याच पद काढुन घ्यावं अशी मागणी या परीसरातील 'घाटघर' ग्रामस्थांनींच थेट वनविभागाकडे केली. तर गुणाजींचे मित्र अणि बांधकाम व्यावसायिक सगुण भडकमकर यांच नाव 'उफरटावग' या धबधब्याला 'सगुण धबधबा' असं दिल्याची तक्रारही गावकर्‍यांनी केली.

close