भारताचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय

November 23, 2010 9:38 AM0 commentsViews: 9

23 नोव्हेंबर

नागपूर टेस्ट अखेर भारताने खिशात घातली आहे. आणि त्याचबरोबर 3 टेस्टची ही सीरिजही 1-0ने जिंकली आहे. टेस्टच्या चौथ्या दिवशी न्यूझीलंडची दुसरी इनिंग भारताने फक्त 175 रन्समध्येच गुंडाळली. आणि एक इनिंग आणि 198 रन्सनी विजय मिळवला. आज सकाळपासून पिच बॉलर्सना साथ देत होतं. हरभजन आणि ओझाच्या स्पीनसमोर न्यूझीलंडची पहिल्या फळीतील बॅटसमन झटपट बाद झाले. पहिल्या एका तासातच त्यांची निम्मी टीम आऊट झाली. मॅक्युलम 25, रॉस टेलर 29 आणि जेसी रायडरने 22 रन्स केले. पण इतर बॅट्समन दुहेरी आकडाही गाठू शकले नाहीत. भारतातर्फे हरभजन आणि इशांत शर्माने प्रत्येकी 3 तर प्रग्यान ओझा, रैनाने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. या टेस्टमध्ये 191 रन्सची धुवाँधार खेळी करणार्‍या राहुल द्रविडला मॅन ऑफ द मॅच तर आपल्या ऑल राऊंड कामगिरीने सर्वांना चकीत करणार्‍या हरभजन सिंगला मॅन ऑफ द सीरिज चा पुरस्कार देण्यात आला.

भारतीय टीमने पहिल्या इनिंगमध्ये न्युझीलंडविरूद्ध 373 रन्सची आघाडी घेतली. आणि याच आघाडीमुळे भारताने निर्णायक तिसर्‍या मॅचमध्ये विजय मिळवला. ाारताचा द वॉल राहूल द्रविडने सीरिजमधले सर्वाेत्तम 191 रन्स केले. जवळजवळ दहा तास तो मैदानावर तळ ठोकून होता. राहूल द्रविडबरोबर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि कॅप्टन महेंद्रसिंग धोणीने महत्त्वाची भूमिका बजावली. दोघांच्याही सेंच्युरीची अपेक्षा क्रिकेटप्रेमी बाळगून होते. पण दोघांच्याही सेंच्युर्‍या पूर्ण झाल्या नाही. सचिनने 129 बॉल्समध्ये 61 रन्स केले तर धोणीनेही आक्रमक खेळ करत 156 बॉल्समध्ये 98 रन्स केले. त्याने द्रविडबरोबर सहाव्या विकेटसाठी 193 रन्सची महत्त्वाची पार्टनरशिप रचली.

close