विरोधी पक्ष नेत्यांसह गृहमंत्र्यांची ऑर्थर रोड कारागृहाला भेट

November 23, 2010 9:54 AM0 commentsViews: 4

23 नोव्हेंबर

महाराष्ट्राचे गृहमंत्री आर.आर.पाटिल आणि विरोधी पक्ष नेते एकनाथ खडसे यांनी आज आर्थर रोड कारागृहाला भेट दिली. यावेळी पाक दहशतवादी मोहम्मद अजमल कसाब याचीही दोघांनी भेट घेऊन त्याची विचारपूस केली. यावेळी जो बोया वो पाया असं कसाब म्हणाला. असं पाटील यांनी सांगितलं. सुरक्षेच्या कारणास्तव कसाबला आर्थर रोडमधून हलवण्याबाबत विचार सुरु असल्याचंही पाटिल यांनी सांगितलं. मागच्या अधिवेशनाच्या काळात विरोधी पक्षाने आर्थर रोड जेलमध्ये आरोपींना अनेक सवलती दिल्या जातात. त्यांना फळ, सुका मेवा मिळत असतो, असा आरोप केला होता. या पार्श्वभुमीवर गृहमंत्री आर.आर.पाटिल यांनी विरोधी पक्ष नेते एकनाथ खडसे यांना सोबत घेऊन ही सरप्राईज विझीट आयोजित केली होती.

गृहमंत्री आर.आर.पाटिल आणि खडसे यांनी आर्थर रोड जेलची पाहणी केली. जेलचं कामकाज कसं चालतं याची माहिती घेतली. यावेळी ज्या कैद्यांना सुविधा मिळत आहेत त्यांना त्या सुविधा कोर्टाच्या आदेशानुसार दिल्या जात असल्याची कागदपत्र मंत्री महोद्यांना दाखवण्यात आली.

close