मंदीमुळे दिवाळीतही महाग वस्तूंच्या विक्रीत घट

October 31, 2008 6:15 AM0 commentsViews: 4

31 ऑक्टोबर, मुंबईरवींद्र अरोरायंदाच्या दिवाळीत व्यापार्‍यांना काहीसं नाराज केलं आहे. कारण दरवर्षी दिवाळीच्या दिवसांत तिप्पट खरेदी होते. पण यावेळी ग्राहकांनी कॉसली सामानाला फारशी पसंती दिलेली नाही. त्याचा थेट परिणाम झाला आहे तो दुकानदारांच्या नफ्यावर.यंदाच्या दिवाळीत मंदीचा फटका दिसून आला. हायएन्ड फोन , एसी आणि प्लाझ्मा टीव्हीसारख्या महाग वस्तूंची यंदाच्या दिवाळीत फारशी खरेदी झाली नाही. खरं तर मागच्या वर्षी याचं घरगूती वस्तूंनी चांगली कमाई केली होती. पण या वर्षी ग्राहकांनी महाग प्लाझ्मा टी.व्ही च्या ऐवजी पंचवीस ते तीस हजारांच्या बत्तीस इंची एलसीडी स्क्रीन खरेदी करण्यावर जास्त भर दिला. म्हणजेच ग्राहकांनी स्वस्तात मस्त अशा घरगुती वस्तू खरेदी केल्या. याचा सगळ्यात जास्त फटका हाय एन्ड मोबाईलला बसला. ग्राहकांनी फक्त आठ ते दहा हजारांच्या रेंजमधल्या मोबाईल्सनाच पसंती दिली.मुंबई -दिल्लीसोबत जयपूर आणि लुधियाना सारख्या छोट्या शहरांतही हीच स्थिती आहे. तिथल्या ग्राहकांनी किंमत विचारूनच घरगुती वस्तू खरेदी करण्यावर भर दिला. स्वस्त होम थिएटर आणि कमी किमतीच्या एलसीडी स्क्रीनच्या टी.व्ही.चं ग्राहकांना पसंत पडले. मागच्या वर्षीच्या तुलनेत घरगूती वस्तूंची विक्री पंचवीस टक्क्यांनी कमी झाली आहे.यंदाच्या दिवाळीत ग्राहकांनी ट्रेंडी वस्तू खरेदी करण्याकडे पाठ फिरवली. कारण महागाईच्या दिवसांत शेवटी बजेट सांभाळण्यावरच त्यांनी भर दिला.

close