लोकसभा-राज्यसभेत सलग दहाव्या दिवशीही विरोधकांचा गदारोळ

November 23, 2010 10:16 AM0 commentsViews: 5

23 नोव्हेंबर

टू-जी स्पेक्ट्रमवरुन लोकसभा आणि राज्यसभेत सुरु असलेला गोंधळ आज सलग दहाव्या दिवशीही सुरुच राहिला. सभागृह सुरु होताच विरोधी पक्षांनी जोरदार मागणी करत गोंधळाला सुरुवात केली. त्यामुळं दोन्ही सभागृहं बारा वाजेपर्यंत तहकूब करण्यात आली आहेत. विरोधक जेपीसी मागणीवर ठाम आहेत. तर सत्ताधारी युपीए सरकार विरोधकांची ही मागणी फेटाळून लावतं आहे. त्यामुळं संयुक्त संसदीय समितीच्या मागणीवरुन लोकसभा आणि राज्यसभेत कोंडी कायम आहे.

close