‘आदर्श’मध्ये अनेकांचे बेनामी फ्लॅट

November 23, 2010 10:30 AM0 commentsViews: 1

23 नोव्हेंबर

राज्याचे सत्ताकारण बदलवणा-या आदर्श सोसायटीत अनेक बड्या राजकीय नेत्यांचे आणि सनदी अधिका-यांचे फ्लॅट असल्याचं आढळलं. तसंच अनेकांनी बेनामी नावांवर फ्लॅट घेतल्याचं पुढं येतं आहे. चंद्रपूरमध्ये राहणार्‍या सुरेश आत्राम यांच्याही नावावरही आदर्श सोसायटीत फ्लॅट आहे. चंद्रपुरात इलेक्ट्रिशयन म्हणून रोजंदारी करणार्‍या आत्राम यांना हे ऐकताच धक्का बसला. आजवर कधीही मुंबई न पाहिलेल्या आत्रामांच्या नावावर हा फ्लॅट कुणी घेतला हा मात्र प्रश्नच आहे. आत्राम यांची कागदपत्रं वापरुन कुणीतरी हा प्रकार केला असावा अशी शक्यता आहे.

आदर्श सोसायटीच्या भल्यामोठ्या इमारतीमध्ये एक फ्लॅट सुरेश आत्राम यांच्या नावावर आहे. चंद्रपूर मध्ये इलेक्ट्रीशयन म्हणून रोजंदारी करणा-या या व्यक्तीनं हा फ्लॅट घेतला कसा हा प्रश्न तर आहेच पण आदर्शच प्रकरण बाहेर आल्यावर सुरेश आत्रामांना अनेकांचे फोन आले. पण आर्थिक स्थिती सामान्य असलेल्या आत्राम यांना याबद्दल काहीच माहिती नाही.

गेल्या अनेक वर्षापासून चंद्रपूरमध्ये भाडेकरु म्हणून राहतात. सुरेश आत्राम याच्या नावे 66 लाखाचा फ्लॅट कोणी बुक केला हे कोड न सुटणारं आहे त्यांनी अनेक दा नोकरी साठी त्यांची माहिती अनेक ठिकाणी दिली होती त्यातून त्यांच्या कागदपत्राचा वापर झाला असावा असा त्यांना संशय आहे

या घोट्याळ्याची चौकशी सीबीआय कडून केली जात आहे अनेक ठिकाणी बोगस नावांचा वापर करून तर फ्लॅट दिले नसावे यावर या प्रकरणानंतर तपासून पहाण्याची गरज आहे सुरेश आत्राम यांच नाव पुढे आल्यानं आदर्श प्रकरणात आनखी एक नव वळण पुढे आलं आहे

close