उत्तर कोरियाचा दक्षिण कोरियावर हल्ला

November 23, 2010 10:58 AM0 commentsViews: 2

23 नोव्हेंबर

उत्तर कोरियानं दक्षिण कोरियावर हल्ला केला आहे. या हल्ल्यात एक जवान ठार झाला तर 12 जण जखमी झाले. पिवळ्या समुद्राजवळ असलेल्या येयॉनपियांग इथं तणावाचं वातावरण आहे. याठिकाणी हल्ला करताना उत्तर कोरियानं तब्बल 50 क्षेपणास्त्रांनी हल्ला चढवला. याहल्ल्यामुळं तिथल्या घरांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाल आहे. तर हवेत धुरांचे मोठे लोळ पाह्यला मिळताहेत. काळ्या धुरानं परिसरातलं आकाश व्यापून गेलं आहे. दरम्यान, बचावात्मक पवित्रा घेत दक्षिण कोरियानं उलट हल्ला चढवला. ही सगळी परिस्थिती हातळण्यासाठी दक्षिण कोरियाच्या अध्यक्ष आणि सुरक्षा दलाचे अधिकारी यांच्यात तातडीची बैठक सुरु आहे.

close