रवी कोका यांच्या रांगोळीची गिनीज बुकमध्ये नोंद

November 23, 2010 1:00 PM0 commentsViews: 49

23 नोव्हेंबर

जालन्यातल्या एका ध्येयवेड्या शिक्षकानं रेखाटलेल्या रांगोळीची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. रवी कोका यांनी 30 जानेवारी रोजी 86 हजार 71 चौरस मीटर रांगोळी साकारली होती. या रांगोळीची गिनीज बुकमध्ये नोंद झाली. त्याचबरोबर लिम्का बुकमध्येही या महाकाय रांगोळीची नोंद झाली आहे. रांगोळीची ही भारतीय कला जागतिक स्तरावर नेण्यासाठी कोका यांनी हा प्रयत्न केला आहे. यासाठी 20 टन रांगोळी वापरण्यात आली तर रांगोळी काढण्यासाठी 51 सहाय्यकांनी त्यांना मदत केली होती. ही विशाल रांगोळी काढण्यासाठी तब्बल 34 तास 39 मिनिटं लागली.

close