भाजप उमेदवारांविरुध्द मतदान करणार्‍यांना रोखा – संजय धोत्रे

November 23, 2010 1:59 PM0 commentsViews: 55

23 नोव्हेंबर

भाजप उमेदवारांविरुध्द मतदान करणार्‍या मतदारांना मतदानापासूनच रोखा असा खळबळजनक सल्ला अकोल्याचे भाजपचे खासदार संजय धोत्रे यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिला. अमरावती पदवीधर मतदारसंघात निवडणुकीच्या प्रचारादरम्यान त्यांनी धोत्रे यांनी विधान केलं आहे. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार हे उपस्थीत होते. या मतदारसंघात भाजपचे विजय पाटील आणि विद्यमान आमदार बी टी देशमुख यांच्यात जोरदार लढत आहे.

close