‘पॅकेज’च्या नावावर मंजूर निधी नको !

November 23, 2010 2:57 PM0 commentsViews: 2

23 नोव्हेंबर

महाराष्ट्राचे नवे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपला पहिला दौरा मराठवाडयापासून सुरु केला. मराठवाडा, विदर्भ आणि खानदेश यांच्या विकासासाठी पॅकेज दिले जातात. यावर अजितदादानी आपलं मत व्यक्त केले ते म्हणाले की, वेगवेगळ्या खात्यांमार्फत दिला जाणारा निधी एकत्रित करून पॅकेजची घोषणा करणं चूक आहे. त्यामुळेच मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशसाठी पॅकेज जाहीर झाली तेव्हा आम्ही पश्चिम महाराष्ट्रासाठी पॅकेज जाहीर केले नाही. त्याचं कारण जो निधी खर्च व्हायचाच आहे, तेच पॅकेज म्हणून जाहीर करणं मला चुकीच वाटतं, असं स्पष्ट मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. मंजूर निधीच्या व्यतिरिक्त जर निधी दिला जाणार असेल तरच त्याला पॅकेज म्हणायला हवं असं म्हणत अजित पवारांनी त्यांची सर्वस्वी जबाबदारी मुख्यमंत्र्यांवर टाकली आहे.

close