गौतम गंभीरवर एका टेस्ट मॅचची बंदी

October 31, 2008 5:37 AM0 commentsViews: 3

31 ऑक्टोबर, दिल्लीब्युरो रिपोर्टदिल्ली टेस्टमध्ये गंभीर आणि वॉटसन यांच्यात झालेल्या शाब्दिक चकमकप्रकरणी मॅच रेफ्री ख्रिस ब्रॉड यांनी गौतम गंभीरला एक टेस्ट मॅच खेळण्यास बंदी घातली आहे. रन्ससाठी धावणार्‍या गंभीरला वॉटसननं जाणुनबूजून अडवण्याचा प्रयत्न केला होता. याला गंभीरनंही चांगलंच उत्तर दिलं होतं. आयसीसीच्या मॉरल कोड ऑफ कंडक्टचा भंग केल्याने कलम 2.4 अंतर्गत गौतम गंभीरवर ही कारवाई करण्यात आली आहे. या निर्णयाविरोधात तो आयसीसीकडे फेरविचाराचे अपील करू शकतो. या प्रकरणी वॉटसनला कालच मॅचफीच्या दहा टक्के रकमेचा दंड भरण्याची शिक्षा सुनावण्यात आली होती.भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान दिल्लीमध्ये सुरू असलेल्या तिसर्‍या टेस्ट मॅचच्या दुसर्‍या दिवसाचा खेळ संपल्यावर या दोघांनाही मॅच रेफरींच्या चौकशीला सामोरं जावं लागल होतं. दोघांवरही गंभीर आरोप असल्याने या प्रकरणाची लगेचच 30 ऑक्टोबरला सुनावणी झाली होती. वॉटसनला 30 ऑक्टोबरलाच शिक्षा सुनावण्यात आली होती.

close