लेफ्टनंट कर्नल मंदार नेने यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

November 23, 2010 5:23 PM0 commentsViews: 3

23 नोव्हेंबर

अरूणाचल प्रदेशातील तवांग येथे शुक्रवारी भारतीय हवाईदलाचं हेलीकॉप्टर कोसळून बारा जणांचा मृत्यू झाला. त्यामधे लेफ्टनंट कर्नल मंदार नेने या मूळच्या पुण्यातील युवकाचा दुदैर्वी मृत्यू झाला. 1993 साली एनडीए मध्ये नेने यांची निवड झाली. 1996 साली प्रशिक्षण पूर्ण झाले. नंतर ते डेहराडून येतील इंडियन मिलीटरी ऍकॅडमी मध्ये ते दाखल झाले. जून 97 साली त्यांची मद्रास सॅपर्सच्या 7 रेजीमेंटमधे नियुक्ती झाली. मंदार यांनी आसाममधील तेजपूर, जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा, राजस्तानातील नसिराबाद आणि महाराष्ट्रातील नगर येथे गॅरीसन इंजिनीअर या पदावर काम केले. पुण्याच्या वैकुंठ स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात लष्करी इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आलं यावेळी अनेक वरीष्ठ लष्करी अधिकारी हजर होते.

close