बिहारमध्ये एनडीए आघाडीचा ऐतिहासिक विजय

November 24, 2010 9:43 AM0 commentsViews: 1

24 नोव्हेंबर

बिहारमध्ये एनडीए आघाडीनं ऐतिहासिक विजय मिळवला आहे. तब्बल दोनशेहून अधिक जागांवर आघाडी घेत नीतिश कुमारांनी बिहारची सत्ता एकहाती राखली आहे. सुरुवातीपासूनच नितीशकुमारांच्या जेडीयू आणि भाजपनं मोठ्या आघाडीकडे वाटचाल सुरू केली आणि अखेरपर्यंत ही आघाडी कायम ठेवली.. विशेष म्हणजे बिहारच्या मतदारांनी नीतिशकुमारांच्या विकासाच्या मुद्यांना साथ देत लालू आणि पासवान जोडीला मात्र स्पष्ट नकार दिला. तीच स्थिती काँग्रेसचीही आहे. काँग्रेसला तर दोन आकडी संख्याही गाठता आलेली नाही. काँग्रेसचे युवराज राहुल गांधी यांचा करिश्म्याची जादू बिहारवर काहीच चालली नसल्याचं यावरुन दिसतं. 243 जागांपैकी जेडीयू आणि भाजपनं206 जागांवर आघाडी घेतली. तर लालूंच्या राजद आणि पासवानांच्या लोकजनशक्ती पार्टी फक्त 24 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेसला अवघ्या5 जागांवर आघाडी मिळाली. तर अपक्ष आणि इतर पक्ष 8 जागांवर आघाडीवर आहेत.

close