कर्नाटकात मुख्यमंत्रीपदी येडीयुरप्पा कायम

November 24, 2010 9:55 AM0 commentsViews: 2

24 नोव्हेंबर

कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पांना आता अखेर अभय मिळाला आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी तेच कायम राहणार असल्याची माहिती भाजपचे प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी दिली. येडीयुरप्पांच्या कुटुंबियांनी आणि नातेवाईकांनी सरकारी भूखंड लाटल्याच्या प्रकरणातून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती. पण आता ते राजीनामा देणार नाही हे स्पष्ट झालं. त्यामुळं येडीयुरप्पांपुढं भाजप नेतृत्व झुकलं का असा सवाल विचारला जातो.

close